By : Sangharshkranti Team ,2026-02-13
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.13 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मायंबा देवस्थान परिसरात असलेल्या जाज्वल्य संजीवन समाधीस्थळाचे मायंबा देवस्थानचे आध्यात्मिक तेज अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराच्या भव्य जिर्णोद्धार कार्याला गती देण्यात आली आहे. लाखो-कोटी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाचे महात्म्य मानवी जीवनाला सौख्य, समतोल आणि आत्मिक शांती प्रदान करणारे मानले जाते. दर्शनाने अंत:करणी समाधान लाभल्याचा अनुभव भक्त वारंवार व्यक्त करतात.
७२ कोटींच्या खर्चातून साकार होणार भव्य मंदिर समाधी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण मंदिर नांदेड येथील काळ्या पाषाणात उभारले जाणार आहे. १०० बाय १५० चौरस फूट जागेत उभारण्यात येणाऱ्या या मंदिराची रचना भव्य आणि दिव्य असेल. मंदिर ६४ भव्य खांबांवर उभे राहणार असून प्रत्येक खांबावर ६४ योगिनींची शिल्परचना साकारण्यात येणार आहे.
भविष्यात वाढणाऱ्या नाथ भक्तांचा विचार करून १०८ फूट उंचीचे, चार भव्य द्वार असलेले आणि हजारो वर्षे टिकेल असे मंदिर उभारण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे. हे संपूर्ण कार्य भाविकांच्या देणगीच्या माध्यमातून साकार होणार असून पुढील तीन वर्षांत मंदिर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विविध घटकांसाठी देणगी स्वरूप :- मंदिर उभारणीसाठी खालीलप्रमाणे देणगी स्वीकारली जात आहे -
शिखर - ₹५१ लाख
ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः- ₹१ लाख
जाळी / खिडकी - ₹५१ हजार
खांब - ₹५१ हजार
आदेश / अलख निरंजन - ₹२१ हजार
मासा / गलथा टॉप / जोता / झालर - ₹२१ हजार
पायरी दगड / गाभारा दगड - ₹११ हजार
गलथा जोता - ₹७ हजार
चिमटा, डमरू, त्रिशूल चित्र - ₹५ हजार
जोता प्लेन दगड / कंगन जोत / भिंत दगड / फरशी - ₹५ हजार
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी उपक्रम
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी या धार्मिक उपक्रमांतर्गत प्रत्येक भाविकाने आपल्या श्रद्धेनुसार योगदान द्यावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
नाथ परंपरेचा आध्यात्मिक वारसा जपणारे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी श्रद्धेचे भव्य प्रतीक ठरणारे हे मंदिर उभारण्यासाठी भाविकांनी उदंड प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..