शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

By : Sangharshkranti Team ,2026-02-15

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.15 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

 रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटना नोंदणी प्रक्रियेच्या उद्देशाने आयोजित सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. सभेला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी आणि अधिक व्यापक करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ असून, संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यालयाच्या प्रगतीत थेट योगदान देऊ शकतो, असे ते म्हणाले.

प्राचार्य श्री. वसंत नरवडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेमागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाशी आपुलकीचे स्नेहबंध कायम राहावेत, हीच या उपक्रमाची मूलभूत भूमिका आहे. विद्यालयाच्या आर्थिक बळकटी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, वैचारिक समृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यासाठी संघटना प्रभावी व्यासपीठ ठरेल. संतुलित विकास साधत शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या सहविचार सभेस सरपंच सुजाता भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, राजेंद्र उगले, बिभीषण उगले, सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश गांगर्डे, अर्जुन उगले गुरुजी, पत्रकार उज्वलाताई उल्हारे, डॉ. सुधीर गुंजाळ, दिलीप जाधव, भगवान साळुंके, कृषी सहाय्यक मिलिंद भोसले, समीर शेख गुरुजी, आदिक उगले, महेश बोरुडे, प्रवीण लुणिया, आदिल शेख आदी मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटनेची अधिकृत स्थापना व नोंदणी करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. लवकरच कार्यकारिणी जाहीर करून पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला नवसंजीवनी मिळून आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक व सुरक्षा या सर्व बाबींमध्ये संतुलित प्रगती साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!