आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

By : Sangharshkranti Team ,2026-02-18

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

राष्ट्रीय सेवा योजनेच्या अरणगाव येथील आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये ह.भ.प. राजेंद्रजी गोरे महाराज यांचे चला घडवूया नवी पिढी या विषयावर युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे व्याख्यान संपन्न.

 सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव मधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने  आयोजित अरणगाव येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवशी (दि. १३ फेब्रुवारी २०२६) ह.भ.प. राजेंद्रजी गोरे महाराज (अध्यक्ष साईबाबा प्रतिष्ठान, मिरजगाव व सचिव श्री सं.ग. म. ग्रा. वि. प्र., मिरजगाव) यांचे चला घडवूया नवीन पिढी या विषयावर युवा पिढीला मार्गदर्शन करणारे व्याख्यान संपन्न झाले.या व्याख्याना मध्ये त्यांनी युवकांना अनेक उदाहरणे देऊन वागण्याचे व व्यक्तिमत्व विकासाची विकासाचे सल्ले दिले.  पुढे जाऊन आई-वडील हे आपल्यासाठी श्रेष्ठ दैवत आहेत, त्यांचा सन्मान करावा त्यातूनच आपली प्रगती होणार आहे असे सांगितले. आई-वडिलांच्या पायी चार धामाचे पुण्य एकवटले आहे असे सांगितले. आपल्या सर्वांच्या जीवनातील आई- वडिलांचे महत्त्व विदित करताना महाराजांनी आपल्या जीवनातील अनेक रोमांचकारी प्रसंग आणि आठवणी सर्व श्रोत्यांसमोर मांडल्या. शेवटी जाता जाता त्यांनी आपली सर्वांची नाळ पर्यावरणाशी कशी जोडलेली आहे हे तुकारामांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून पटवून दिले.

 प्रमुख उपस्थिती मधील नन्नावरे महाराज यांनी आजच्या व्याख्यानातील विषय  खूप महत्त्वाचा व आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे असे म्हटले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी भूषवले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना कृषीविषयक मार्गदर्शन केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शिस्तप्रिय राहून गावामध्ये विविध विषयासमधी जनजागृती करावी व गावाच्या विकासासाठी आपले योगदान म्हणून श्रमदान करावे असे सांगितले. कार्यक्रमास अरणगावातील आजी, माजी, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्रा. डॉ. प्रियांका दहिवले, प्रा. डॉ. प्रियांका जाधव,  कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब पारखे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. सागर कारंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन हे कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. तेजस गायकवाड यांनी केले.


श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!