By : Sangharshkranti Team ,2026-02-13
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.13 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मानवाला आपले भौतिक जीवनमान सुधारायचे असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट बहुतेकांच्या लक्षात आलेली असून शिक्षण घेतलेला प्रत्येकजण सुशिक्षितच असेल याची खात्री देता येत नाही. कुटुंबियांनी केलेले संस्कार आणि समाजाकडून झालेली जडणघडण यातूनच माणूस घडत असतो असे प्रतिपादन म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणीचे संचालक तथा एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले. लोणी हायस्कूल लोणी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. लोणी हायस्कूल चे मुख्याध्यापक संभाजी सस्तारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.विश्वास विश्वास कंधारे, सरपंच किसनदेव बडे, अंबादास बडे, शशिकांत भांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व.काकू व स्व.नाना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारंभाची सुरुवात झाली. परिक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता त्यातून धडा घेत जीवनामध्ये यशाचे शिखर गाठता येते हा माझा स्वानुभव आहे. दहावीला ज्या विषयात नापास झालो होतो त्याच विषयात पुढे पी.एच.डी. केली असे प्राचार्य डाॅ.विश्वास कंधारे यांनी उपस्थितांना सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सस्तारे सरांनी विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त परिक्षेचे महत्त्व समजावून देत त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणित केला. भांडेकर सर, बडे सर, ढाकणे मॅम, चौधरी सर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दहावीच्या अनेक विद्यार्थिनींनी भाषणातून कवितेचा आधार घेत कहीं खुशी कहीं गम पद्धतीच्या आपल्या संमिश्र भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीम.ढाकणे मॅम यांनी केले. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडकर सर, कंठाळे सर, कोळेकर सर, जोगदंड मॅडम, खेडकर सर, होडशिळ मॅडम, बाबासाहेब बडे, संजय ढगे यांसह सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. शाळेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटी मिष्टान्नाचा बेत ठेवला होता.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..