पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

By : Sangharshkranti Team ,2026-02-13

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.13 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

 आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने सुरू केलेल्या पारधी विकास आराखडा योजनेची पारदर्शकपणे अंमलबजावणी करून खऱ्या वंचितांपर्यंत लाभ पोहोचवावा, अशी मागणी आदिवासी शक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

शासनाने पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू केली असली, तरी राजूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाची पद्धत आणि यापूर्वीचे अनुभव पाहता अनेकदा वंचित लाभार्थ्यांना वगळून ठराविक लोकांनाच प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या पारधी समाजालाच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी आदिवासी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष जयश्री काळे यांच्यासह काजल काळे, वृषाली काळे, ऐश्वर्या काळे, योगिता काळे, उज्वला काळे, मयूर काळे, चंचल काळे, दीक्षा भोसले, रेबीन चव्हाण, कृष्णा चव्हाण, शिवानी चव्हाण, सरिता चव्हाण, कैकाई चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने वंचित लाभार्थी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..