By : Sangharshkranti Team ,2026-02-15
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.15 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित महा पशुधन एक्स्पो 2026 कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पशुधन संवर्धन ही काळाची गरज असून शेती आणि पशुधन यांचा परस्परसंबंध अत्यंत महत्त्वाचा आहे.
गोमातेचे महत्त्व लक्षात घेत राज्यात गोविकास आयोग स्थापन करण्यात आला असून गोमूत्र व शेणावर आधारित विविध उत्पादनांमुळे नव्या मूल्यसाखळीची निर्मिती होत आहे. नैसर्गिक शेतीकडे वळल्यास उत्पादनखर्च कमी होऊन उत्पन्न वाढू शकते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देशी गाईंचे संवर्धन, वैरण विकास कार्यक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर राज्य शासन विशेष भर देत आहे. पशुधन क्षेत्राचा विकासदर 25% पर्यंत नेण्याचे लक्ष्य राज्याने निश्चित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेल्या महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महिला गोपालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 366 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यासाठी ₹214 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 19 जिल्ह्यांचा समावेश करून ₹150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच उदगीर येथील दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी ₹100 कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
पशुवैद्यकीय सेवांचे आधुनिकीकरण, फिरते पशुचिकित्सालय, पशु ॲम्ब्युलन्स आणि लंपीसारख्या आजारांवरील लसीच्या निर्मितीसाठी संशोधन यावर राज्य शासन कार्यरत आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी ₹500 कोटींचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यात व पशुसंवर्धन क्षेत्राचाही समावेश करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कृषी व दुग्धव्यवसाय क्षेत्र शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरक्षित ठेवण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या पशुधन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील नव्या संधी आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांसमोर मांडले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट पशुधनाच्या पशुपालकांचा व राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त पशुपालकाचा सत्कार केला.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!