मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

By : Sangharshkranti Team ,2026-02-18

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबई येथे मुंबई क्लायमेट वीकचे उदघाटन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, मुंबई क्लायमेट वीक भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्र साध्य करता येते, हे सिद्ध केले आहे. भारताने 260 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता पार केली आहे. महाराष्ट्र 48 गिगावॅट क्षमतेसह देशात महत्त्वाची भूमिका बजावत असून 2030 पर्यंत 50% पेक्षा अधिक ऊर्जा हरित स्रोतांमधून निर्माण करण्याचे राज्याचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडॉरमध्ये नवीकरणीय ऊर्जा, शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, सार्वजनिक वाहतुकीत EV, तसेच पूर नियंत्रण आणि क्लायमेट-स्मार्ट शहरी नियोजनावर भर देत आहे. पर्यावरणीय कृती गावागावांपर्यंत पोहोचवत हवामान अनुकूल शेती, जलव्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित ग्रामीण मूल्यसाखळी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

मुंबईमध्ये ग्लोबल साऊथसाठी क्लायमेट फायनान्स गेटवे बनण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. शाश्वत पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीसाठी जागतिक संस्थांनी मुंबईसोबत भागीदारी करावी.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!