By : Sangharshkranti Team ,2026-02-15
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.15 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टतर्फे आयोजित राजरत्न पुरस्कार सोहळा - 2026 येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने 24 वर्षे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या माध्यमातून राजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला जात आहे.
श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा पूर्वेकडे विस्तार करून स्वराज्याला अधिक बळकट केले. अनेक स्वाऱ्या केल्या, अनेक महत्त्वाची युद्धे जिंकली. तसेच जगन्नाथ मंदिराचे पुनर्निर्माण करून बंद पडलेल्या प्रथा पुन्हा सुरु केल्या. त्यामुळे ओडिसाच्या संग्रहालयामध्ये नागपूरकर भोसले घराण्याच्या आठवणी पाहायला मिळतात. तसेच गोंड राजांनी नागपूरला शहराचे रूप दिले आणि भोसले घराण्याने नागपूरला सुनियोजित शहर म्हणून विकसित केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. श्रीमंत राजे रघुजी यांची तलवार महाराष्ट्र सरकारने भारतात आणली आणि लवकरच ती नागपूरला आणली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री संपतिया उईके (मध्य प्रदेश), श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम), श्रीमंत राजे मुधोजी भोसले, प.पू. गुरु माऊली अण्णासाहेब मोरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!