By : Sangharshkranti Team ,2026-02-20
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.20 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2026 येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान काय असतो हे ज्या आग्रा येथील किल्ल्यातून जगाला दाखवले, त्याच किल्ल्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा साजरा करत आहोत. पुढील वर्षी शिवजयंतीला आपण एकत्र येऊ तेव्हा येथे शिवस्मारक उभारण्याची तयारी करत असू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आणि मराठ्यांचा इतिहास शिकवला जात असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुघलांनी देशाला चोहोबाजूंनी घेरले होते तेव्हा अनेक राजे मुघलांना शरण गेले, मात्र त्यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. याच प्रेरणेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र करत स्वराज्य स्थापन केले. तसेच मावळ्यांना विश्वास दिला की ही लढाई देव, देश आणि धर्म यासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने मुघलांच्या लाखोंच्या फौजेचा गनिमी काव्याने पराभव केला. खुद्द औरंगजेबही दख्खन ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्रात आला. मात्र, त्याच महाराष्ट्रात मराठ्यांनी त्याची कबर खोदली.
यावेळी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री योगेंद्र उपाध्याय (उत्तर प्रदेश), अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!