By : Sangharshkranti Team ,2026-02-14
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.14 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव रविवारी15 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होत आहे. दरम्यान याच पंचक्रोशीतील लिंगाळेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला लिंपणगावच्या लिंपणगावच्या यात्रोत्सवानिमित्त यात्रा कमिटी कडून तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यात्रा कमिटी कडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान यात्रेच्या पहिल्या दिवशी महाशिवरात्र असल्याने लिंपणगाव पंचक्रोशीतून सिद्धेश्वर महाराजांना पहाटेच कुटुंबांसमवेत महाभिषेक घालण्यात येतो. त्यानंतर रविवारी 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 9 ते रात्री 11.30 महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ कीर्तनकार हरिभाऊ महाराज गिते दिघोळ यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळपासून पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून श्री सिद्धेश्वर महाराजांना वाजत गाजत शेरनी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी द्वारे मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मिरवणूक सोहळ्या दरम्यान शोभेचे दारू काम हे डोळ्याचे पारणे फेडणारे असते त्यानंतर रात्री 11 वाजता सिद्धेश्वर महाराजांना गावच्या वतीने महाभिषेक घालण्यात येणार आहे. त्याच रात्री मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे यांचा बहुरंगी लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी मंगला व नितीन कुमार बनसोडे यांचा हजर्याचा लोकनाट्य कार्यक्रम होणार आहे आणि त्याच दिवशी साडेतीन ते सहा वाजेपर्यंत मल्लांसाठी जंगी आखाड्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान लिंपणगावचे सिद्धेश्वर महाराज ग्रामदैवत हे नवसाला पावणारे देवस्थान असल्याने महाशिवरात्री दिवशी अनेक दूर वरून भाविक भक्त आपल्या नवस्फूर्तीसाठी मंदिरात हजेरी लावतात. या दैवतावर अपार श्रद्धा असल्याने भाविक नतमस्तक होतात. महाभिषेक घालतात. त्यामुळे तालुक्यात या गावच्या यात्रेला मोठे महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. दरम्यान गावच्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ बरखास्त असल्याने सद्यस्थितीला प्रशासक हे काम पाहत आहेत. परंतु अनेक वर्षापासून तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत यात्रा उत्सव साजरा केला जातो. याही वर्षी उत्साही वातावरणात यात्रा कमिटी कडून यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे समजते. भाविक भक्तांनी शिस्तीचे पालन करून या आयोजित धार्मिक व संस्कृती कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात येत आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!