ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण झळाळी; श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी!

By : Sangharshkranti Team ,2026-02-13

ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण झळाळी; श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान कामगिरी!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.13 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा : वेंकटेश पोदार लर्न स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सन २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या Science Olympiad Foundation आयोजित विविध ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय आणि दैदिप्यमान यश संपादन केले आहे. उत्कृष्ट गुण, मानांकित क्रमांक आणि सुवर्ण पदकांची कमाई करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे.

या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व सविस्तर प्रगती अहवाल प्रदान करण्यात आला. या यशामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरा रामदास पालवे आणि तनिष्का गोरख कोथिंबिरे यांनी सुवर्ण पदक पटकावत शाळेचा मान उंचावला.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल शाळेचे संचालक तसेच तिरुपती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या यशामध्ये समन्वयक श्रीमती सुजाता गुंदेचा मॅडम, श्रीमती हर्षदा वूड मॅडम, श्री एकनाथ शिंदे सर, श्री वैभव उजागरे सर आणि श्रीमती छाया चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, संकल्पनांची सखोल समज आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यावर विशेष भर दिला.

शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, भविष्यातही अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत आणि उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.

श्रीगोंदा परिसरात या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..