वाढदिवसानिमित्त मंदिर जतनासाठी उदार देणगी; श्रीकमलादेवी मंदिरात चेतन ढाळे यांचा सत्कार!

By : Sangharshkranti Team ,2026-02-12

वाढदिवसानिमित्त मंदिर जतनासाठी उदार देणगी; श्रीकमलादेवी मंदिरात चेतन ढाळे यांचा सत्कार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.12 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

 समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा पुढे नेत श्री. चेतन दिलीपराव ढाळे (करमाळा) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामासाठी रोख रुपये ५,०००/- (पाच हजार फक्त) देणगी अर्पण केली. गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मंदिर परिसरात हा उपक्रम पार पडला.

वाढदिवसाच्या निमित्ताने इतरत्र अनावश्यक खर्च टाळत धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी योगदान देण्याचा आदर्श श्री. ढाळे यांनी समाजासमोर ठेवला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंदिर जतन व संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांना या देणगीमुळे निश्चितच बळ मिळणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

या प्रसंगी श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक श्री. अशोक गाठे यांनी श्री. चेतन ढाळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सहपरिवार सत्कार केला. कार्यक्रमावेळी ढाळे परिवार तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. वातावरणात भक्तिभाव आणि समाधानाची भावना दिसून आली.

मंदिराचा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी सुरू असलेल्या जतन व संवर्धन उपक्रमांना समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे. मंदिर समितीने भाविकांना आवाहन केले आहे की, धार्मिक कार्यात सहभाग नोंदवून मंदिराच्या विकासासाठी हातभार लावावा.

दरम्यान, मंदिरासाठी ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून इच्छुक भाविकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 संपर्क :

अशोक गाठे (व्यवस्थापक)

मो. नं. ९४०४७०८९२४


छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..