सुवर्ण-रौप्याची आतषबाजी; पोदार विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी!

By : Sangharshkranti Team ,2026-02-12

सुवर्ण-रौप्याची आतषबाजी; पोदार विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.12 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

 जिद्द, शिस्त आणि कठोर सरावाच्या बळावर वेंकटेश पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डी.एस.ओ. पुणे विभागीय शास्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्ण-रौप्य पदकांची आतषबाजी करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सोलापूर येथे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची आणि आत्मविश्वासाची प्रभावी छाप उमटवली.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटात सम्राटराजे पाचपुते याने अप्रतिम तांत्रिक कौशल्य आणि धडाडीच्या खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या १९ वर्षांखालील गटात ईशा गोरे हिनेही शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. तसेच वेदश्री ढवळे आणि मृणाली सावंत यांनी जिद्दीने लढत प्रत्येकी रौप्यपदक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली.

या दैदिप्यमान यशामागे क्रीडा शिक्षक बाबू बळे सर यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत हेच यशाचे खरे सूत्र ठरले. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी साकारली, अशी भावना शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली.

शाळेचे संचालक आनंद शहा सर तसेच सर्व विश्वस्त सदस्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोदार लर्न स्कूलने क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत राज्यस्तरावर दमदार उपस्थिती दर्शवली असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही अशीच सुवर्ण झेप घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..