By : Sangharshkranti Team ,2026-02-09
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.9 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
कर्जत मध्ये श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. असंख्य बालकांचे श्रद्धास्थान असलेले,भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले करुणामूर्ती, दयासागर, योगिराज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त सदगुरु उद्योग समूह व संलग्न संस्थांच्या वतीने कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक करण्यात आली. गजानन महाराज मंदिरापासून पालखीचे प्रस्थान सकाळी साडेआठ वाजता झाले. सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत कन्या विद्यालय - छत्रपती शिवाजी महाराज चौक - म्हसोबा चौक - शनी मंदिर - गोदड महाराज मंदिर - छत्रपती शिवाजी महाराज चौक - कन्या विद्यालय - श्री गजानन महाराज मंदिर या मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल, पताका, झांज, लेझिम, वारकरी संप्रदाय, नृत्य व फुगडीच्या तालावर भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दुपारी १ वाजता मिरवणूक विसर्जनानंतर श्री संत गजानन महाराजांची महाआरती व पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सदगुरु मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, कुळधरण रोड, कर्जत येथे पार पडला. ह्या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. श्री. राम शिंदे साहेब व खासदार मा .श्री. नीलेशजी लंके साहेब ह्यांनी सदिच्छा भेट दिली.
सदरील कार्यक्रमास सदगुरू उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे, सौ व श्री डॉ सुरेश नेवसे, सिद्धार्थशेठ नेवसे, प्रतीक्षाताई नेवसे, श्री. आदित्य खेडकर, श्री. कैलास खेडकर व परिवार, श्री राजेंद्रजी गोरे, श्री. सखाराम राजळे, श्री. रवी थोरात, सदगुरू कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे व सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व सदगुरू उद्योग समूहाच्या सर्व कर्मचाऱ्यांसह हजारो भाविक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव, श्री सदगुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव , श्री शिवशंकर कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय (बी.टेक) मिरजगाव, संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव, पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका, कृषि तंत्र विद्यालय मिरजगाव, सदगुरु उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कर्जत, श्री सदगुरु मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोडक्ट प्रा. लि.,श्री शिवशंकर पेट्रोलियम, श्री सदगुरु मल्टिस्टेट, गजानन महाराज मिल्क प्रोडक्ट प्रा. लि. तसेच श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास बिगरशेती सहकारी पतसंस्था सहभागी होत्या.
या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. यामध्ये दोनशे पेक्षा जास्त वारकरी मुले आणि विविध महाविद्यालयाचे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या मध्ये सर्व कर्जत परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
महाप्रसादामध्ये जवळपास दहा हजार भाविकांना महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भावीकभक्त दर्शन आणि महाप्रसादासाठी येत होते. सर्व भक्तांनी सदगुरू उद्योग समूहाने भव्य पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमातून सदगुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे आणि कुटुंबीयांची अध्यात्मिक ओढ आणि निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..