विमानतळाच्या माध्यमातून औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By : Sangharshkranti Team ,2026-02-09

 विमानतळाच्या माध्यमातून औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.9 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही शहरांना पौराणिक व आध्यात्मिक वारसा लाभला आहे. यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत आगामी नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आठ ते दहापट भाविक येणार असल्याचा अंदाज आहे. या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओझर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत असून, याद्वारे विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात आघाडीवर असल्याने या विस्तारीकरणामुळे निर्यात, उद्योग आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळेल. यासह नाशिक जिल्ह्याचा विकासही भरारी घेईल.

दावोसच्या माध्यमातून नाशिकसाठी ₹13,000 कोटींची गुंतवणूक येणार असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. ऑटोमोबाईल क्षेत्रात देशातील प्रमुख शहरांपैकी एक म्हणून नाशिकची ओळख अधिक ठळक होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात कोट्यवधींची विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. तर, गोदावरी नदी निर्मल राहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत असून, नाशिक रिंग रोड जिल्ह्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, व इतर मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..