तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव - CM फडणवीस

By : Sangharshkranti Team ,2026-02-09

तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव - CM फडणवीस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.9 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारनेर, अहिल्यानगर येथे तौरल इंडिया-सुपा प्लांटचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्र या प्रगतीला गती देत आहे. तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र दमदार पाऊल टाकत आहे. तौरल इंडिया–सुपा प्लांट प्रकल्प हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव आहे.

आपल्या सरकारने दावोसमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे ₹50,000 कोटींची गुंतवणूक आणली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ₹11,519 कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 18,000 रोजगार निर्माण होतील, तर उत्तर महाराष्ट्रात जवळपास 75,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, महाराष्ट्र शासन प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते, ह.भ.प. नामदेवशास्त्री महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..