कौटुंबिक लोकशाहीतूनच सुसंस्कृत नागरिक घडतात - शिवशाहीर विक्रम अवचिते

By : Sangharshkranti Team ,2026-01-26

कौटुंबिक लोकशाहीतूनच सुसंस्कृत नागरिक घडतात - शिवशाहीर विक्रम अवचिते

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.26 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

भारत हा प्रजासत्ताक देश असून लोकशाही हीच आपल्या देशव्यवस्थेची खरी ओळख आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या भारताने संपूर्ण जगात लोकशाही राष्ट्र म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र ही लोकशाही अधिक बळकट आणि प्रभावी करायची असेल तर ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. लोकशाही हा शब्द केवळ ऐकून किंवा समजून घेऊन थांबू नये, तर त्याची खरी व्याप्ती प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. एकदा ही संकल्पना समाजमनात खोलवर रुजली की विचारशील, स्वाभिमानी आणि बलशाली राष्ट्रनिर्मिती शक्य होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते शिवशाहीर विक्रम अवचिते यांनी केले.

बोल्हेगाव परिसरातील सहारा अकॅडमी व इकरा प्रायमरी स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून शिवशाहीर विक्रम अवचिते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. नवनाथ कातोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. आकाश कातोरे यांनी उपस्थिती दर्शविली.

प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य डॉ. सय्यद सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात नगरसेवक श्री. नवनाथ कातोरे यांनी शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, भविष्यात शाळेसाठी कोणतीही मदत लागल्यास आपण सदैव उपलब्ध राहू, असे आश्वासन दिले. तर प्रमुख पाहुणे नगरसेवक श्री. आकाश कातोरे यांनी पालकांना मार्गदर्शन करत प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले.

आपल्या प्रेरणादायी मनोगतात शिवशाहीर विक्रम अवचिते म्हणाले की, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, आपले मत मांडण्याची संधी मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक कुटुंबात लोकशाही मूल्यांचा अवलंब झाला, तर त्यातूनच उद्याचे सुसंस्कृत, विचारशील व प्रगतिशील नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.सना मॅडम व प्राचार्य डॉ. सय्यद सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..