By : Sangharshkranti Team ,2026-01-26
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.26 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
सदगुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये यावर्षीचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. शंकरराव नेवसे सर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैन्य अधिकारी श्री माणिकराव देशपांडे हे लाभले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला श्री. माणिकराव देशपांडे सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, देशाच्या सोनेरी इतिहासाला उजाळा देत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कृषी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हरित क्रांती, धवल क्रांती यांचा आढावा घेतला. शेती व शेतकरी हा देशाचा खरा आधार असून तोच देशाला पुढील काळात तारेल म्हणून आपण चांगल्या प्रकारे शेतीची या मातीची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे सर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात जवान आणि किसान देशाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत आणि राहतील. त्यातील चांगल्या किसानांची निर्मिती करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. आणि ते तडीस नेऊ. देश घडवण्यात आमचे महाविद्यालय खारीचा वाटा नक्कीच उचलेल असे आश्वासन दिले. आपण व्यवसायाभिमुख शेती करा. असे आवाहन केले.
प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे सर, संस्थेचे अध्यक्षा कल्याणी ताई नेवसे मॅडम, संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे सर, संचालक श्री सिद्धांत नेवसे सर, नोडल ऑफिसर अण्णासाहेब रासकर, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे सर, समन्वयक श्री राहुल म्हेत्रे सर, सदगुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका पूजा इनामके मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन आढाव यांनी मानले.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..