थांग-ता स्पर्धेत वेंकटेश पोदार लर्न स्कूलचा दणदणीत विजय; १२ विद्यार्थी राज्यस्तरासाठी पात्र!

By : Sangharshkranti Team ,2026-01-18

थांग-ता स्पर्धेत वेंकटेश पोदार लर्न स्कूलचा दणदणीत विजय; १२ विद्यार्थी राज्यस्तरासाठी पात्र!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय स्तरीय थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडल्या.

या स्पर्धेत वेंकटेश पोदार लर्न स्कूल, श्रीगोंदा येथील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून सर्व १२ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील क्रीडा मार्गदर्शक श्री. प्रविण कोंढावळे  व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विजयी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल शिक्षण संचालक श्री. आनंद शहा सर तसेच सर्व ट्रस्ट सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक श्री. बळे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन, मेहनत व सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

राज्यस्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवावे, अशा शुभेच्छा शाळेच्या वतीने देण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..