By : Sangharshkranti Team ,2026-01-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.18 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर 2026 अंतर्गत खेळाडूंचा सत्कार केला. यासोबतच या ग्रँड टूर निमित्त आयोजित कार्यक्रम सर्वांसाठी खुले झाल्याचे घोषित केले.
सुमारे 35 देशांमधील खेळाडूंच्या सहभागाने पुण्यात सुरू होत असलेला हा उपक्रम केवळ एक क्रीडा कार्यक्रम नसून, दीर्घकालीन परंपरा निर्माण करणारा जागतिक दर्जाचा सोहळा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे ही केवळ सांस्कृतिक राजधानी नाही, तर तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि वेगाने विकसित होणाऱ्या भविष्यातील शहराचे प्रतीक आहे. इतिहास आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या पुणे जिल्ह्याचे भौगोलिक वैविध्य, पश्चिम घाटांचे नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पुणेकरांचा उत्साह या ग्रँड टूरला एक वेगळी ओळख देईल.
ही ग्रँड टूर पुढील काळात जागतिक स्पोर्ट्स कॅलेंडरवरील महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल आणि क्रीडा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पुण्याचा ठसा अधिक ठळक करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले, निसर्गसौंदर्य आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अनुभवता येईल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्तम सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंसाठी येथे जागतिक मानकांनुसार आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजक आणि संबंधित विभागांचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..