नामनिर्देशित नगरसेवक अमीनभाई शेख , महावीर पटवा यांचा संघर्षनामाकडून सन्मान!

By : Sangharshkranti Team ,2026-01-18

नामनिर्देशित नगरसेवक अमीनभाई शेख , महावीर पटवा यांचा संघर्षनामाकडून सन्मान!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.18 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या दूरदृष्टीतून नुकतीच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल उद्योगपती महावीर पटवा तसेच दै. सिटीझनचे संपादक व श्री संत शेख महंमद महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमीनभाई शेख यांचा संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संघर्षनामाचे मुख्य संपादक मेजर भिमराव उल्हारे व संघर्षक्रांती न्यूज 24 च्या संचालिका उज्वला उल्हारे यांच्या हस्ते महावीर पटवा व अमीनभाई शेख यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, नगरपरिषदेत सामाजिक जाणिव असलेले, उद्योग, पत्रकारिता व धार्मिक-सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व प्रतिनिधी म्हणून निवडले जाणे हे श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. महावीर पटवा यांचा उद्योगक्षेत्रातील अनुभव आणि अमीनभाई शेख यांचे पत्रकारिता, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान नगरपरिषदेस दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सन्मान स्वीकारताना महावीर पटवा व अमीनभाई शेख यांनी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचे आभार मानत, मिळालेल्या संधीचे सोने करत श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी प्रामाणिक व लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 सन्मान  करताना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यशाची कामना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..