By : Sangharshkranti Team ,2026-01-16
संघर्षनामा वृत्तसेवा । पारनेर
दि . १६ जानेवारी २०२६
निघोज प्रतीनिधी,
निघोज आणी परिसरात गेली चार दिवस दहशत निर्माण केलेले दोन मनोरुग्णांना मळगंगा - साईनाथ गणेश युवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या सहकार्याने मध्यरात्री दोन वाजता ताब्यात घेऊन इसळक निंबळक या ठिकाणी असलेल्या रुग्ण सह मनोयात्री पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पारनेरचे पोलिस निरीक्षक खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हेडकॉन्स्टेबल कडूस व सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण भुमिका घेतली होती. तसेच मळगंगा - साईनाथ गणेश युवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. निघोज व परिसरात असलेल्या सहकारी संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय तसेच गर्दीच्या ठिकाणी या दोन मनोरुग्णांनी लोकांना शिवीगाळ करणे, धावून जाणे, चावा घेण्याचा प्रयत्न करणे आदी विविध कृत्यं करीत त्रास देत होते गेली चार दिवसांपासून सकाळी साधारण दहा ते बारा व सायंकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत त्यांचे हे त्रास देण्याचे सत्र सुरू होते. याबाबत पत्रकार संघाने स्थानिक पोलीसांना गेली दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती. मात्र स्थानिक पोलीस बाहेरगावी असल्याने दखल घेण्यात आली नाही. बुधवार दि.१४ रोजी सायंकाळी सात वाजता मळगंगा मंदीर परिसरात या दोन मनोरुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना चावा घेण्याचा तसेच दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मळगंगा - साईनाथ युवा गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य यांनी एकत्र येऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनी दहशत निर्माण करुण पळून गेले. याबाबत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ,आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश ढवण तसेच पत्रकार संघ विभागीय कार्यालय पत्रकार सदस्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक खेडकर यांच्याशी संपर्क करीत याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच निघोज येथील स्थानिक हेडकॉन्स्टेबल कडूस यांना याबाबत सुचना केली. त्यांनी लगेच याबाबत रात्रभर विवीध ठिकाणी बंदोबस्त ठेवला. मध्यरात्री दोन वाजता दोन्ही मनोरुग्णांना ताब्यात घेऊन मनोयात्री पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.
चौकट
मळगंगा - साईधाम युवा गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच समवेत हेडकॉन्स्टेबल कडूस यांनी या दोन मनोरुग्णांना ताब्यात घेऊन मनोयात्री पुनर्वसन केंद्रात दाखल केले आहे. या मध्ये मंडळाच्या तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..