अहिल्यानगर देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी शांताराम निघोजकर, नवीन विश्वस्त मंडळाची सर्वानुमते निवड

By : Sangharshkranti Team ,2026-01-16

अहिल्यानगर देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी शांताराम निघोजकर, नवीन विश्वस्त मंडळाची सर्वानुमते निवड

संघर्षक्रांती वृतवेध | निघोज

दि . १६ जानेवारी २०१६

निघोज प्रतिनधी,

अहिल्यानगर येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. शांताराम रामचंद्र निघोजकर (सर) यांची निवड करण्यात आली आहे. रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नवीन विश्वस्त मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. शांताराम रामचंद्र निघोजकर, उपाध्यक्षपदी श्री. प्रीतम कुमार चंद्रकांत बेदरकर, सचिवपदी श्री. राजेश रमेश खोल्लम, सहसचिवपदी श्री. उमेश गोविंदराव बेलेकर, तर खजिनदारपदी सौ. धरती संतोष घबाडे यांची निवड करण्यात आली.

विश्वस्त म्हणून श्री. गणेश रोहिदास होनावळे, श्री. प्रकाश चंद्रकांत चांदेकर, सौ. मोहिनी संतोष खोल्लम, सौ. ज्योती ज्ञानेश्वर खोल्लम, श्रीमती रोहिणी विवेक घबाडे, श्री. किरण चंद्रकांत चांदेकर यांची निवड झाली आहे.

याशिवाय सल्लागार मंडळामध्ये श्री. संतोष सुरेशचंद्र खोल्लम, श्री. रमेश सखाराम खोल्लम तसेच सौ. अलका उदय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन विश्वस्त मंडळाची निवड झाल्यानंतर श्री "संत नरहरी महाराज पुण्यतिथी" निमित्त दि. २९ जानेवारी २०२६ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या नामसप्ताह सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करून विविध उपक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली.

या सभेचे अध्यक्षस्थान डॉ. श्री. प्रीतम कुमार बेदरकर यांनी भूषविले. यावेळी डॉ. बेदरकर यांच्या "आनंदी जगूया" या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ही संपूर्ण सभा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण चांदेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

या निवडीमुळे देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..