By : Sangharshkranti Team ,2026-01-16
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.16 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी तब्बल २७ महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी सत्ता स्थापन केल्याबद्दल श्रीगोंदा शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात आज श्रीगोंदा शहरातील माऊली संपर्क कार्यालय येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी लाडू वाटून तसेच फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा केला.
या आनंदोत्सव कार्यक्रमाला श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुनिताताई संतोष खेतमाळीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, शहर व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पक्षाच्या या घवघवीत यशाचा आनंद साजरा केला.
कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळीस यांनी भाजपावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून अधिक जोमाने, पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी देखील राज्यभरात मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत भाजपाच्या विकासात्मक धोरणांमुळेच जनता पुन्हा पुन्हा पक्षाला संधी देत असल्याचे सांगितले. श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
कार्यक्रमात जल्लोष, घोषणाबाजी व आनंदोत्सवाच्या वातावरणात भाजपाच्या यशाचे स्वागत करण्यात आले. श्रीगोंदा शहरात भाजपाचा विजय म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..