By : Sangharshkranti Team ,2026-01-16
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.16 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्हॉट्सअॅपद्वारे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत फिर्यादी वैभव आसाराम खेंडके (वय २७, व्यवसाय, रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १ जानेवारी २०२६ पासून अज्ञात इसमाने त्यांच्या मोबाईल ८४२२८६ ०७३२ क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज करून प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपीच्या सांगण्यानुसार फिर्यादीने पूर्ण रक्कम न देता केवळ १ लाख ५० हजार रुपये दिले. यामुळे आरोपी संतप्त झाला आणि पुन्हा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून तू आमची फसवणूक केली आहेस, पैसे दिले नाहीस तर तुझे प्रायव्हेट फोटो व्हायरल करून तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही जिथे दिसेल तिथे ठार मारू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या गंभीर प्रकारानंतर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता, तो आकाश पोपट मोरे (वय २४, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली.
त्यानंतर पोलिसांनी बापु विठ्ठल शिंदे (वय ३१) व किरण विठ्ठल शिंदे (वय २९, दोघे रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, कोर्ट श्रीगोंदा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २० जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन व तीन चारचाकी वाहने असा एकूण ५४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी आरोपी व वाहनांची संख्या वाढण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पो.ना. गहिनीनाथ यादव, पो.कॉ. महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, मयुर तोरडमल तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु व नितीन शिंदे सहभागी होते.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे व पो.कॉ. सचिन वारे करत असून आरोपींच्या आंतरजिल्हा गुन्हेगारी साखळीचा शोध घेतला जात आहे. श्रीगोंदा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे खंडणीखोरांचे धाबे दणाणले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..