By : Sangharshkranti Team ,2026-01-16
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.16 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिरात आगामी शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मीरा खेंडके, उपाध्यक्षपदी चेतना मांगडे, सचिवपदी सुनील ढवळे तर खजिनदारपदी बालूदादा मखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मीरा खेंडके व इतर पदाधिकाऱ्यांचा तसेच नगरसेवक श्रीकृष्ण धुमाळ, सोनूदादा कोथिंबीरे, अनिल महाराज औटी यांचा सत्कार समितीचे मावळते अध्यक्ष बालूदादा मखरे यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक अरविंद कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालूदादा मखरे यांनी मानले.
या बैठकीस माजी नगरसेवक सतीश मखरे, नितीन सोनवणे, आप्पासाहेब सोनवणे, रमण सोनवणे, अर्जुन सोनवणे, राजाभाऊ जगताप, शिवाजी शेळके यांच्यासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य अरविंद कापसे, पत्रकार राजेंद्र राऊत, नाना शिंदे, दीपक मखरे, आजीज शेख, गणेश पारे, दिलीप लबडे, इंजि. शाम जरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात अरविंद कापसे यांनी सांगितले की, यावर्षीचा शिवजयंती उत्सव नेहमीप्रमाणे भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शिवप्रतिमा पूजन, पालखी मिरवणूक, मॅरेथॉन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, छत्रपती बाईक रॅली, ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, शिवकालीन शस्त्रविद्या, कराटे प्रात्यक्षिक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महात्मा फुले सर्कल येथे दीपोत्सव अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या भव्य उत्सवाला तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन तसेच तमाम शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मीरा खेंडके तसेच उपाध्यक्ष चेतना मांगडे, सचिव सुनील ढवळे व खजिनदार बालूदादा मखरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व स्तरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस
पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस
ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस
राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!
गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!
शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...
लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे
आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…
शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड
पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..