म्हातारपिंप्री प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम प्रा.संदीप ससाणे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

By : Sangharshkranti Team ,2026-01-16

म्हातारपिंप्री प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाचा आदर्श उपक्रम प्रा.संदीप ससाणे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.16 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. प्रा. संदीप ससाणे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात तीन वर्षे वयाची तब्बल २० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये रुद्राक्ष, कैलासपती, मोहगनी, अर्जुन यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश होता. केवळ वृक्षारोपणावरच न थांबता झाडांचे संगोपन, नियमित पाणीपुरवठा व संरक्षण यावर विशेष भर देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

प्रा. संदीप ससाणे हे एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम सातत्याने करत असून एक विद्यार्थी – एक झाड या संकल्पनेला ते प्रोत्साहन देत आहेत. विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व समजावून सांगत त्यांच्यामध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. बापू देवकर, देविदास हिरडे होते, अग्निपंख फाउंडेशनचे बाळासाहेब काकडे, संत तुकाराम वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून पर्यावरण संवर्धनासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन केले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदाऱ्या विसरत चालले आहेत. मात्र अशा काळातही आपल्या कृतीतून समाजाला सकारात्मक संदेश देणारे काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे असतात. प्रा. संदीप ससाणे हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासोबतच भावनिक नात्यांचे महत्व अधोरेखित केले आहे.

त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव वाढीस लागली असून ग्रामस्थांमध्येही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे भावी पिढी अधिक जबाबदार आणि निसर्गप्रेमी घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..