पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर च्या मतदारांचे मानले आभार!

By : Sangharshkranti Team ,2026-01-16

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर च्या मतदारांचे मानले आभार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.16 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून,विधानसभा, नगरपरीषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रीक असल्याची असल्याची प्रतिक्रीया मंत्री ना.विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विधानसभा नगरपरीषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहिल्यानगरच्या जनतेला समर्पित करीत असल्याचे त्यांनी याप्रसंगी आ.संग्राम जगताप, डाॅ सुजय विखे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराचे अध्यक्ष अनिल मोहीते, विनायक देशमुख, सुनिल रामदासी उपस्थित होते.

शहरातील आशीवार्द बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक युतीच्या कार्यकर्त्यासमवेत जल्लोष साजरा केला.भगव्या गुलालाची उधळण करून ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना मंत्री विखे पाटील यांनीही घोषणा देवून युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री विखे पाटील आ.संग्राम जगताप आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

आ.संग्राम जगताप आणि डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढवण्यात आली.विकासाची एक भूमिका घेवून आम्ही जनतेसमोर गेलो होतो.जनतेने भाजपा राष्ट्रवादी युतीला मोठे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहील्यानगरच्या सभेतच विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याचा दिलेला शब्द आजच्या विजयाने पूर्ण केल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला मोठे यश  पाहाता राज्यातील जनतेन त्यांच्या नेतृत्वाला मोठे समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले.मुंबई पुणे महापालिका प्रमाणेच अन्य शहरामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या  विकासात्मक बदलाला लोकांनी स्विकारले हेच या निकालाने दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही हे निवडणुकीपुर्वीच मी सांगितले होते तेच निकालातून स्पष्ट झाले.झोपेतून जागे व्हायचे आणि निवडणुकीला जायचे हे दिवस आता संपले आहेत.लोकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.पराभव झाला की फक्त निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टिका करण्यापलिकडे महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टिका ना.विखे पाटील यांनी केली.

अहिल्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले.नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा स्ट्राइक रेट तसाच राखला गेला.महानगर पालिकेच्या यशावर  जनतेने केलेले शिक्कमोर्तब पाहाता  आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजपाला मोठे यश मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस

पशुधन संवर्धनातून कृषीक्षेत्राला नवसंजीवनी - मुख्यमंत्री फडणवीस

ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स कर्करोगाविरुद्ध लढ्याला नवी दिशा - CM फडणवीस

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव!

नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गाळप हंगामाची यशस्वी सांगता!

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

शासकीय कार्यालयांत आता नागरिकांना अभिप्राय देता येणार ...

लिंपणगावच्या सिद्धेश्वर महाराजांचा महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव!

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश साळवे

आपला एक दगड नाथ मंदिरासाठी…

शिक्षणाने माणुस घडतो पण माणुसकी कमवावी लागते - साहित्यिक अनंत कराड

पारधी विकास आराखड्याची पारदर्शक अंमलबजावणी करा- आदिवासी शक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..