By : Sangharshkranti Team ,2026-04-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 एप्रिल 2026
(उज्वला उल्हारे)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, पुरस्कार वितरण, तसेच इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तसेच रात्री राजसदरेवर अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबवी येथील शिवशाहीर विक्रम अवचिते निंबवीकर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार मा. सुधांशु त्रिवेदी हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ब्रिगेडियर संग्राम मोहिते, नागपूरचे मुधोजीराजे भोसले, दुर्ग अभ्यासक श्री आनंद पाळंदे, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, श्री शिवाजी रायगड स्मारक समिती व शिवचरित्र साहित्य प्रकाशन समिती प्रमुख श्री सुधीरजी थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मावळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवशाहीर विक्रम अवचिते यांनी आपल्या पहाडी आणि धारदार शैलीत पोवाडा आणि स्फूर्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा राजसदरेवर सन्मान करण्यात आला.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर राजसदरेवर आपली कला सादर करण्याची संधी मिळणे आणि सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील आणि शाहिरी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असल्याची भावना शाहिरांनी व्यक्त केली.
चौकट-
या कार्यक्रम निमित्ताने निंबवी ग्रामस्थ, तसेच वारकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ शाहीर दादा पासलकर, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, मुंबई पोलीस उपायुक्त श्री. गणेश गावडे साहेब, श्री राहुल गावडे साहेब, डॉ. गोपालकृष्ण गावडे साहेब, उद्योजक श्री. अनिरुद्ध शिर्के साहेब, श्री. भास्कर गावडे साहेब, तसेच मित्रपरिवार यांचेकडून शिवशाहीर विक्रम अवचिते यांचे अभिनंदन करण्यात आले.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!