By : Sangharshkranti Team ,2026-03-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.7 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
शेवगाव आगारातून मढी मार्गे मायांबा या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याने नाथभक्तांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. यात्रेच्या काळात मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र मढी येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहतुकीची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार मोनिका ताई राजळे यांनी शेवगाव आगार प्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानंतर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली.
नाथपंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मच्छिंद्रनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीच्या सोयीअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन मढी मार्गे मायांबा या तीर्थक्षेत्रासाठी एसटी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
या बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर श्री कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, विश्वस्त उत्तमराव मरकड, विश्वस्त मदन मरकड, देवस्थानचे अधिकारी अशोक पवार यांच्यासह कर्मचारी, गावकरी आणि नाथभक्तांनी बसला हार घालून व नारळ फोडून पूजन केले. या वेळी भाविकांनी बससेवेचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
शेवगाव आगारातून शेवगाव, तिसगाव, मढी, घाटशिरस, वृद्धेश्वर आणि मायांबा या तीर्थक्षेत्रांपर्यंत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र मढी, आदिनाथ वृद्धेश्वर तसेच मायांबा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार सकाळी ८.३० वाजता शेवगाव येथून बस सुटून सकाळी ९.१५ वाजता श्री क्षेत्र मढी येथे पोहोचते. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता मायांबा येथून बस सुटून दुपारी १२.०० वाजता श्री क्षेत्र मढी येथे येते. तसेच संध्याकाळी ५.३० वाजता शेवगाव येथून दुसरी फेरी सुटून सायंकाळी ६.१५ वाजता मढी येथे पोहोचते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता मायांबा येथून बस सुटून सकाळी ७.३० वाजता श्री क्षेत्र मढी येथे पोहोचते.
या बससेवेच्या माध्यमातून मढी, वृद्धेश्वर आणि मायांबा या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांना मोठी सोय झाली असून यात्रेच्या काळात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भाविकांनीही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार मोनिका ताई राजळे व एसटी प्रशासनाचे आभार मानले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!