कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

By : Sangharshkranti Team ,2026-03-24

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 24 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

मा. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन व मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ येथे उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना संबोधित केले. या पहिल्याच दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. उपराष्ट्रपती यांची उपस्थिती लाभल्याने या विद्यापीठाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखून देशात कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली आणि स्किल इंडिया ही व्यापक चळवळ उभी केली. महाराष्ट्रानेही या उपक्रमात पुढाकार घेत कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकारने या विद्यापीठाची स्थापना करून कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा दिली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून, 10,000 महिलांना AI प्रशिक्षण देण्याचा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे. 

सर्व क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्यासाठी राज्यात कौशल्यसंपन्न मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ महाराष्ट्र निश्चितपणे तयार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विद्यापीठाचे अभिनंदन करून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसोबतच देशाच्या उन्नतीतही योगदान देण्याचा संकल्प मनात ठेवावा असे आवाहन केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!