By : Sangharshkranti Team ,2026-03-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.7 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र कोंभळी येथून श्री क्षेत्र मढीकडे निघालेल्या पायी दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या सुरेल निनादात आणि नाथ महाराज की जय च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. या दिंडीमुळे परिसरात भक्तीचा अनोखा उत्सवच अनुभवायला मिळाला.
ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने प्रस्थान झाले. दिंडीमध्ये हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नाथांप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने या पायी दिंडीत सहभाग घेतला. विशेष म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक अत्यंत उत्साहाने दिंडीमध्ये सामील झाले होते.
दिंडीच्या प्रस्थानावेळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले वारकरी, टाळ-मृदुंगाच्या तालावर गात असलेले अभंग, भगव्या पताकांनी सजलेली दिंडी आणि नाथांच्या नामगजराने परिसरात भक्तिमय ऊर्जा निर्माण झाली होती. शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळख असलेल्या या दिंडीतील भाविकांनी अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पायी प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मार्गातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते.
दिंडी पुढे जात असताना मार्गातील गावांमध्येही भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पाणी, अल्पोपहार आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, भक्तांचे मोठ्या आदराने स्वागत केले जात आहे. त्यामुळे या दिंडीमुळे गावागावात भक्तीचा उत्साह आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडत आहे.
श्री क्षेत्र मढी येथे ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त दरवर्षी हजारो भाविक पायी दिंड्यांद्वारे उपस्थित राहतात. कोंभळी येथून निघालेली ही दिंडीही त्यातील एक महत्त्वाची आणि शिस्तप्रिय दिंडी मानली जाते.
नाथांच्या नामस्मरणात पुढे मार्गक्रमण करणारी ही पायी दिंडी केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि समाजातील एकतेचा पवित्र संगम असल्याची भावना भाविकांमध्ये दिसून येत आहे. ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा प्रवास नाथभक्तीचा अखंड झरा असल्याचे भाविकांनी यावेळी व्यक्त केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!