कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर यांच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्" />

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

By : Sangharshkranti Team ,2026-03-19

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 19 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

कर्जत तालुक्यातील कोंभळी येथे श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर यांच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव व नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यामुळे पंचक्रोशीत भक्ती, श्रद्धा व आध्यात्मिकतेचा उत्सव होणार आहे.

रविवार, दि. २२ मार्च २०२६ पासून सुरू होणारा हा धार्मिक सोहळा गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सांगता होणार आहे. या कालावधीत दररोज सकाळी नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी नामांकित कीर्तनकारांच्या ओजस्वी कीर्तन सेवेमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळणार आहे.

कीर्तन सेवेचे मानकरी पुढीलप्रमाणे :-

ह.भ.प. अविनाश महाराज साळुंके (झी टॉकीज फेम)

ह.भ.प. महाराष्ट्र भूषण कबीर महाराज आत्तार (शिवचरित्रकार)

ह.भ.प. कीर्तन केसरी संतोष महाराज वनवे

ह.भ.प. धर्मभूषण निलेश महाराज चव्हाण

ह.भ.प. भागवताचार्य सोपान महाराज सानप

या सर्व कीर्तनकारांच्या प्रबोधनपर, प्रभावी आणि विचारमूल्यांनी समृद्ध कीर्तनातून संत परंपरेचे विचार, समाजजागृती व अध्यात्मिक मार्गदर्शन भाविकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढणार असून, हा महोत्सव भाविकांसाठी एक संस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.

दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन सेवा होणार असून, त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, भजन कार्यक्रम व भक्तिगीतांचा कार्यक्रमही पार पडणार आहे.

या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून, पंचक्रोशीतील तसेच दूरवरून येणाऱ्या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!