By : Sangharshkranti Team ,2026-04-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 एप्रिल 2026
(उज्वला उल्हारे)
सावरगाव ता. आष्टी, जि. बीड येथे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह श्री नवनाथ महाराज ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ ते शानिवार दि . १८ एप्रिल २०२६ या दरम्यान करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची तयारी सुरू आहे. श्री नवनाथ मंदिर मठ, भुगांव ता . मुळशी जि .पूणे व सावरगाव येथे वैकुंठवासी ब्र भू . रघुनाथ महाराज उंबरेकर ,वैकुंठवासी गुरुवर्य सावजीबाबा यांच्या आशीर्वादाने ह भ प वसंत भाऊ शेंडगे यांचे प्रेरणेने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह सोहळा गर्भगिरी पर्वत श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव ता .आष्टी जि .बीड येथे उत्साहात पार पडणार आहे.
या धार्मिक सोहळ्याला विविध मान्यवर संत, कीर्तनकार व प्रवचनकार यांची उपस्थिती लाभणार असून, आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ९ ते ११नवनाथ ग्रंथ पारायण व सकाळी ११ ते दुपारी २ विश्रांती भोजन संगीत दुपारी ४ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ मच्छिंद्रनाथ आरती रात्री ७ ते ९ कीर्तन सेवा होणार रात्री ९ वा महाप्रसाद रात्री भक्तांसाठी नामस्मरण, हरीजागर भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा अनमोल लाभ मिळणार आहे.
प्रमुख कीर्तन सेवा :-सप्ताहादरम्यान ह.भ.प. विविध महाराजांचे प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात आले असून, यात ह.भ.प. श्री म्हातारदेव महाराज आठरे, ह.भ.प. श्री मोरेश्वर महाराज मोरे, ह.भ.प. श्री दिपकनाथ महाराज (नवनाथ कथाकार), ह.भ.प. श्री भागवत महाराज उंबरेकर, ह.भ.प. श्री एकनाथ महाराज राजुरकर, ह.भ.प. श्री भगवान महाराज नाटकरे, तसेच ह.भ.प. श्री राऊत दादा महाराज व ह.भ.प. श्री गणेश महाराज कार्ले यांची होणार आहे.
शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बंकट महाराज ढवळे सिद्धटेक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .
या सप्ताहात विविध गावांतील भजन मंडळे, महिला भजन मंडळे तसेच युवक मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात नामस्मरणाचा गजर घुमणार असून भक्तीमय वातावरण अनुभवता येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट, सावरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. नवनाथ मंदिर मठ, समस्त ग्रामस्थ भुगांव व सावरगाव, तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू आहे.
या सप्ताह सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सुरेश आण्णा धस ,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पठारे हे असणार आहेत .
चौकट- या सप्ताहासंदर्भात अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांक मो .७७९८७५ ००७५ / ९४२३११६२१४ उपलब्ध करून दिले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामसप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नवनाथ महाराज मठ समस्त ग्रामस्थ भुगांव, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मंडळ सावरगाव यांचेकडून करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सावरगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन घडणार असून, हा सोहळा आध्यात्मिक उन्नतीचा महत्त्वाचा पर्व ठरणार आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!