म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

By : Sangharshkranti Team ,2026-04-04

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 एप्रिल 2026

पारनेर [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] - पारनेर तालुक्यातील एकमेव ग्रामदैवत असलेले निर्मलग्राम व श्री क्षेत्र म्हस्केवाडी येथील श्री गणेश देवस्थान च्या वतीने संकष्ट चतुर्थी उत्सवाचे रविवार दि ५ रोजी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरडे यांनी दिली .

    पारनेर तालुक्यातील गणपती देवस्थानां पैकी एकमेव मोठे व ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या निर्मलग्राम व श्रीक्षेत्र म्हस्केवाडी येथील श्री गणेश देवस्थान येथे प्रत्येक संकष्ट चतुर्थी , अंगारक चतुर्थी , अनंत चतुर्दशी , श्री गणेश जयंती या उत्साहाच्या वेळी अहिल्यानगर , पुणे , नाशिक जिल्हयातून श्री गणेशाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने यथासांग दर्शन घेण्यासाठी नतमस्तक होण्याकरिता येतात .

     रविवार दि . ५ रोजी असलेल्या संकष्ट चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणेश देवस्थान च्या वतीने सकाळी ८ ते ९ वाजता ज्येष्ठ मार्नदर्शक पानसरे काकांच्या सुश्राव्य वाणीतून श्री गणेश याग व श्री गणेश अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार असून महाआरती चंद्रोदय रात्री ९ .४५ वाजण्याच्या वेळी महाआरती चे मानकरी तथा महाप्रसादाचे अन्नदाते सोनवणे , शिंदे , बोबडे , वाघ , लोंढे , हारके , ढवळे व वेताळ परिवाराच्या यांच्या वतीने महाआरती करण्यात येणार आहे .

     यावेळी गावचे सुपुत्र डॉ . रविंद्र सिताराम म्हस्के यांच्या सुविद्य पत्नी सौ . डॉ . सरिता रविंद्र म्हस्के यांची देशाची राजधानी म्हणून ओळखली जात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका पदी व आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्री गणेश देवस्थान ट्रस्ट , निर्मलग्राम ग्रामपंचायत , विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था , मित्र परिवार , आप्तेष्ट व ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे ही ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरडे यांनी सांगितले .

चौकट - 

    श्री क्षेत्र व निर्मल ग्राम या नावाबरोबरच ग्रामदैवत श्री गणेश देवस्थान म्हणून नावारूपाला आणण्यासाठी श्री गणेश देवस्थान ट्रस्टचे सर्वच पदाधिकारी सातत्याने झटत असतात , त्यांना ग्रामपंचायत , सेवा सहकारी संस्थां चे पदाधिकारी व ग्रामस्थ ही झटून मदत करतात . 

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!