By : Sangharshkranti Team ,2026-04-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 एप्रिल 2026
(उज्वला उल्हारे)
अहिल्यानगर :- बिल्डर कन्स्ट्रक्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत तरुण अभियंता आकाश अशोक सूर्यवंशी यांना “बेस्ट इंजिनिअरिंग (परफॉर्मन्स) अवॉर्ड २०२५/२६” प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आकाश सूर्यवंशी यांनी एम.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिल्डर कन्स्ट्रक्शन क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे, मेहनतीने व शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. विशेषतः बिलिंग विभागात त्यांनी केलेल्या अचूक व उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांच्या या यशामागे वडील श्री अशोक विश्वनाथ सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. मुख्याध्यापक, निवेदक, पत्रकार तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या संस्कारातूनच आकाश यांची यशाकडे वाटचाल अधिक भक्कम झाली आहे.
हा पुरस्कार म्हणजे आकाश यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कष्ट, जिद्द आणि चिकाटीचे फलित असून, त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठण्याची दिशा निश्चित केली आहे.
चौकट-
आकाश यांच्या या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधिकारी वैभव महांगरे, भाऊसाहेब सुद्रिक, मा. पोलीस निरीक्षक रोहिदास सोनवणे, प्रवीण सुद्रिक, संचित सोनवणे, महेश सोनवणे, दत्तात्रय सूर्यवंशी, नानासाहेब सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी तसेच सर्व कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी आनंदोत्सव साजरा करत त्यांचे अभिनंदन केले.
परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आकाश सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करून कुटुंब व समाजाचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!