विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

By : Sangharshkranti Team ,2026-03-19

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 19 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

मिरजगाव:- येथील संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय मध्ये आज माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सन २००९ पासून शिक्षण क्षेत्रात काम करणारे सदगुरु कृषी महाविद्यालयाने कित्येक अधिकारी, पदाधिकारी, व्यावसायिक घडविले आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचे अनुभव एकमेकांना सांगता यावे, दोन शब्द हितगुज करता यावे. नवीन विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव ऐकता यावेत याकरिता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाने केले होते.  बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री राजेंद्रजी गोरे सर होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे सर तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री सखाराम राजळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामदास बिटे सर नोडल अधिकारी आण्णासाहेब रासकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन आढाव, प्रा. सुनंदा चाकणे, प्रा. पूजा इनामे, प्रा. मोहिनी शिंदे इतर सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी आणि  महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक बॅचमधील काही प्रतिनिधी आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांच्या मनोगत मधून त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. या आजच्या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यानंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये  तुमचे अनुभव इतरांना मार्गदर्शक आणि  प्रेरणादायी ठरतील एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध तयार व्हावे, परस्परात सहकार्याची व सुख दुःखात सहभागी होण्याची भावना निर्माण व्हावी तसेच या महाविद्यालयाच्या प्रगतीचे प्रत्येक जण साक्षीदार व्हावे सदगुरू कृषि परिवार म्हणून एकमेकांचे ऋणानुबंध तयार व्हावेत महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आणि हा उद्देश सफल झाला अशी भावना व्यक्त केली.

माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, प्रत्येकाने ध्येय निश्चित करून ते मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसाय हा नोकरीपेक्षा चांगला आहे आणि व्यवसायात कृषी व्यवसाय हा कधीही तारणारा आहे असे मत मांडले.

संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरशेठ नेवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठीण परिस्थितीत सुरू केलेला हा महाविद्यालयाचा शैक्षणिक प्रवास आज इथपर्यंत कसा आला हे सांगून सर्व विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व्यक्त करून प्रत्येकाने आपल्या महाविद्यालयाप्रती सुद्धा आपुलकी दाखवावी आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना प्रगतीसाठी मार्गदर्शन करावे आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे असे आवाहन केले भविष्यात प्रत्येक वर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!