पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

By : Sangharshkranti Team ,2026-04-08

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 8 एप्रिल 2026

(उज्वला उल्हारे)

कर्जत मंडलातील पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियान अंतर्गत आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचा शुभारंभ पहिल्या दिवशी सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष अनिल गदादे यांनी केले.

पहिल्या सत्रात सभापती राम शिंदे यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेवर आधारित संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व पक्षवाढीतील कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस ह.भ.प. बाळासाहेब महाडीक, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची मार्गदर्शक सत्रे पार पडली. एकूण सात सत्रांमधून संघटन कौशल्य, पन्ना प्रमुखांची भूमिका, बूथ व्यवस्थापन, लोकसंपर्क, संवाद कौशल्य व आगामी आव्हानांवर सखोल चर्चा झाली. समारोपाच्या भाषणात सभापती राम शिंदे यांनी “अशा प्रशिक्षण महाआभियानातून सक्षम, प्रशिक्षित व विचारनिष्ठ कार्यकर्ते तयार होतात,” असा विश्वास व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यशाळेदरम्यान मनोरंजन कार्यक्रम, योगासने यांचाही समावेश करण्यात आला होता. या उपक्रमात पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, तालुका कार्यकारिणी सदस्य, सर्व आघाड्या व मोर्चांचे अध्यक्ष व पदाधिकारी, कर्जत नगरपंचायत नगरसेवक- नगरसेविका सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, चेअरमन, मार्केट कमिटी संचालक, दूध संघाचे संचालक तसेच तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निळकंठ शेळके व सरचिटणीस संतोष निंबाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरचिटणीस नंदलाल काळदाते यांनी मानले.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!