By : Sangharshkranti Team ,2026-03-19
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 19 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून शहरात घरपट्टीवरील १०० टक्के शास्तीकर माफी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारचा निर्णय घेणारी श्रीगोंदा ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.
लोकनेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार विक्रम दादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हा निर्णय मंजूर केला आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून थकलेल्या घरपट्टीवरील दंडात्मक शास्तीचा मोठा बोजा नागरिकांच्या डोक्यावरून हलका झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, थकबाकी वसुलीला देखील गती मिळण्याची शक्यता आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शास्तीकर माफीचा लाभ घेतल्यानंतर उर्वरित घरपट्टीची रक्कम तात्काळ भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे.
लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीताताई संतोष खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले तसेच मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत व सर्व नगरसेवकांनीही नागरिकांनी या निर्णयाचा लाभ घेत प्रलंबित थकबाकी भरावी, असे आवाहन केले आहे.
या निर्णयाबद्दल श्रीगोंद्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, शहराच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!