By : Sangharshkranti Team ,2026-05-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.7 मे 2026
(उज्वला उल्हारे)
राज्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक बाजारभाव देणारा म्हणून ओळखला जाणारा ओंकार साखर कारखाना उद्योग समूह सध्या प्रगतीच्या शिखरावर असून, राज्यासह देशभरात आपली दमदार घोडदौड सुरू ठेवत आहे. या उद्योग समूहामार्फत सध्या १७ साखर कारखाने यशस्वीपणे चालवले जात असून, यावर्षी जवळपास ७५ लाख टन ऊस गाळप करण्यात आले आहे. चालू गळीत हंगामात १ कोटी टन गाळपाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्येही या उद्योग समूहाचे कारखाने कार्यरत आहेत. उद्योग समूहाशी सुमारे १८ हजार कामगार, हजारो ट्रॅक्टर-ट्रक चालक, मुकादम व ठेकेदार जोडले गेले असून, लाखो शेतकरी या व्यवस्थेशी निगडीत आहेत. बंद पडलेले अनेक साखर कारखाने पुन्हा सुरू करून काटकसरीचे नियोजन व सक्षम प्रशासन यामुळे उद्योग समूहाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाबुराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार व वाहतूकदारांना वेळेत आणि सर्वाधिक दराने पेमेंट देण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत सोशल मीडियावरून उद्योग समूह व नेतृत्वाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. २ ते ३ हजार कोटी रुपये थकीत आहेत अशा प्रकारची खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, राज्यातील सुमारे १४० साखर कारखान्यांकडे १५ जानेवारीनंतरची सुमारे २१०० कोटी रुपयांची FRP प्रलंबित आहे.
ओंकार उद्योग समूहाने मात्र आपल्या १७ कारखान्यांतून आजपर्यंत १८३० कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले असून, वाहतूकदारांना ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात समूहाचा एकूण टर्नओव्हर ६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, पुढील वर्षी तो किमान ७ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऊस बिलांबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, अशा समाजविघातक घटकांविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व शेतकरी, कामगार व वाहतूकदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योग समूहाच्या वतीने ओमराजे बोत्रे पाटील यांनी केले आहे.
चौकट - सोशल मीडियावरून चुकीची माहिती प्रसारित करून उद्योग समूहाची बदनामी केल्याप्रकरणी संबधितावर लवकरच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिली.
तसेच केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार पेट्रोल-डिझेलमध्ये ३३% इथेनॉल मिश्रण लागू होत असल्यामुळे यंदाचे इथेनॉल व मोलॅसिस अद्याप विक्री झालेले नाही. त्याचे सुमारे ६०० कोटी रुपये उद्योग समूहाला येणे बाकी आहेत.
यामुळे उसाच्या पेमेंटमध्ये केवळ महिनाभराचा विलंब झाला असला, तरी पुढील आठवड्यात शेतकरी, कामगार व वाहतूकदारांचे एकही रुपये थकित राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भविष्यात देशभरात २२ कारखाने चालवण्याचा तसेच पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर गाळप वाढवण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!