By : Sangharshkranti Team ,2026-03-04
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 4 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा : शिवाजीनगर परिसरात वाढती वर्दळ, बाहेरून येणाऱ्या तरुणांची संख्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता स्थानिक रहिवाशांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यानुसार शिवाजीनगरमध्ये येणाऱ्या अनोळखी तरुण मुला-मुलींची आवश्यक ती चौकशी करण्यात येणार असून, भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास तसेच मोठा आवाज करणाऱ्या गाड्यांबाबत थेट पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात येणार आहे. यापुढे भाडेकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच बाहेरून येणाऱ्या तरुणांवर शिवाजीनगरमधील रहिवाशांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत शिवाजीनगर परिसरातील सर्व रूम चालक, अकॅडमी/क्लास संचालक व हॉस्टेल संचालकांसाठी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना रूम देताना किंवा क्लासमध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड (झेरॉक्स प्रत), पालकांचे आधारकार्ड (झेरॉक्स प्रत), विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो तसेच पालकांचे पासपोर्ट साईज फोटो घेणे बंधनकारक राहील. याशिवाय रूम, हॉस्टेल व क्लासचे सर्व नियम आणि वेळेचे निर्बंध विद्यार्थ्यांकडून लेखी स्वरूपात स्वाक्षरीसह घेणे आवश्यक राहील. परिसरातील सर्व हॉस्टेल, क्लास व रूम ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले असून ते कार्यान्वित स्थितीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती आढळल्यास तत्काळ विचारपूस करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान आणि परिसरातील शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. या बैठकीस नगरसेविका मीराताई शिंदे, नगरसेवक प्रशांत गोरे, विनायक ससाने सर, बाळासाहेब दुतारे, लाटे-औटी मॅडम, पारे सर, खरसडे सर, सुभाष आढाव आदी सोसायटी मंडळ तसेच शिवाजीनगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या या एकजुटीमुळे शिवाजीनगर परिसर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!