अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात श्रीक्षेत्र कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीरसात न्हाऊन " />

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

By : Sangharshkranti Team ,2026-03-03

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 3 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

अखंड हरिनामाच्या गजरात आणि नाथांच्या जयघोषात श्रीक्षेत्र कोंभळी नगरी पुन्हा एकदा भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. ॐ चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट, कोंभळी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी अशी भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दिंडीत परिसरातील शेकडो वारकरी, महिला, युवक-युवती तसेच ज्येष्ठ भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. गुरुवार, दि. ५ मार्च ते सोमवार, दि. ९ मार्च २०२६ या कालावधीत हा भक्तिमय प्रवास पार पडणार आहे.

दिंडीची सुरुवात अभिषेक व मंदिरातील पूजाविधीने होणार असून, गाव प्रदक्षिणेनंतर टाळ-मृदुंगाच्या निनादात वारकरी पुढील प्रवासास प्रस्थान करतील. मार्गातील विविध ठिकाणी महाप्रसाद, भजन-कीर्तन, हरिपाठ व हरीकथा यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून, भाविकांच्या सेवाभावामुळे वातावरण अधिक मंगलमय होणार आहे.

शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत विविध गावांतून दिंडीचा प्रवास होत अखेरीस श्री क्षेत्र मढी येथे महाल प्रदक्षिणा व समारोप सोहळा संपन्न होईल. शेवटच्या दिवशी पहाटे महाल प्रदक्षिणा करून दिंडीचा भक्तिमय समारोप करण्यात येणार आहे.

दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टतर्फे भोजन, निवास तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “भक्ती हीच खरी शक्ती” या संदेशातून सर्वांनी शिस्त, स्वच्छता आणि भक्तिभाव जपावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गेल्या २७ वर्षांची परंपरा जपत श्रद्धा, समर्पण आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही पायी दिंडी केवळ धार्मिक यात्रा नसून आत्मशुद्धीचा आणि सामाजिक एकतेचा सोहळा ठरत आहे. गुरुजींच्या ओजस्वी मार्गदर्शनामुळे या दिंडीला अध्यात्मिक अधिष्ठान लाभले असून, कोंभळी नगरी पुन्हा एकदा हरिनामाच्या गजराने दुमदुमणार आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!