By : Sangharshkranti Team ,2026-03-03
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 3 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या घोड धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या आवर्तनामुळे खोडवा ऊस, गहू, उन्हाळी कांदा व फळबागांसाठी हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले जाते. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला जात आहे. घोड मधून एक मार्चपासून हे आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन 26 दिवसांसाठी असणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दोन मार्च रोजी दुपारी 375 क्युशेषने कालव्यात विसर्ग वाढवण्यात आला आहे. तीन मार्च रोजी साडेचारशे क्युसेसने विसर्ग आणखी वाढवणत येईल, अशी माहिती मढेवडगाव चे उपविभागीय अधिकारी टनके यांनी दिली.
यावेळी पत्रकारांना अधिक माहिती देताना घोड सिंचन चे उपविभागीय अधिकारी टणके यावेळी म्हणाले की, उन्हाळी हंगामात जमिनीतील उपलब्ध साठ्याच्या बाष्पीभवनामुळे एक टीएमसी आवर्तनाची गरज असते. त्यानुसार हे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करून शेती पिकांना लागेल तेवढेच पाणी घ्यावे. पाण्याचा अपव्य होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व उन्हाळी हंगामाची तीव्रता पाहता उन्हाळी हंगामाचे हे पहिलेच आवर्तन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. चालू वर्षी उन्हाची तीव्रता आत्तापासूनच जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके वाचली पाहिजे. यासाठी घोड सिंचन विभागाने शेतकऱ्यांसाठी या आवर्तनाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी देखील पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पुढील आवर्तनाला सामोरे जाण्यासाठी लागेल तेवढेच पिकांसाठी पाणी घ्यावे, म्हणजे पुढील हंगामाचे दुसरे आवर्तन योग्य वेळी सोडण्यासाठी मदत होईल. जिथे पाण्याचा अपव्यय असेल तिथे तात्काळ घोडसिंचनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. कारण पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. याबरोबरच मागील थकीत पाणीपट्टी वेळेत भरून पुढील आवर्तनाला विलंब होणार नाही. यासाठी देखील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी टनके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!