By : Sangharshkranti Team ,2025-12-18
संघर्षक्रांती वृत्तवेध | श्रीगोंदा
दि . १८डिसेंबर २०१५
उज्वला उल्हारे याजकडून ,
श्रीगोंदा :-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्या मार्फत राज्यात वेगाने कामे होत असल्याने तसेच आपण नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून शहर आणि जुना प्रभाग क्रमांक ४आताचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्ते आणि गटारीची समस्या सोडवल्याने नागरिकांनी शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलचे स्वागत केले शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शुभांगी पोटे व नगरसेवक पदाची निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार विजयी होतील आणि शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७ब मधील होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ७ब मधील मतदारांच्या भेटीत नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामावर समाधानी असून भविष्यात देखील विकास कामे वेगाने होतील अशी खात्री नागरिकांना आहे असे सांगून पोटे म्हणाले आम्ही विकास कामाच्या माध्यमातून मत मागत आहोत.नागरिकांनी देखील पूर्वीच्या काळात असलेल्या समस्या आणि आमच्या साडेसात वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात झालेली कामे पाहिली आहेत नगर परिषद हि नागरिकांच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने काम करते आम्ही देखील सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानूनच काम केले त्यामुळेच अशक्य वाटणारे स्वतंत्र पॅनल अखेर उभे राहिले उमेदवार नागरिकांच्या विश्वासास पात्र असणारी मिळाले असे सांगून प्रभाग क्रमांक ७ब मधील आपला विजय निश्चित होईल आणि शहर विकासाची घोड दौड सुरू राहील असे स्पष्ट केले.यावेळी मनोहर पोटे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील केलेल्या रविवार पेठ रस्ता,हनुमान नगर मधील प्रलंबित रस्त्यांची केलेली कामे,आदींची माहिती दिली.
*चौकट*
प्रभाग क्रमांक ७ मधील इंदिरा नगर वसाहत हि श्रमिकांची वसाहत असून त्यांना हक्काची जागा मिळावी हि मागणी वर्षानुवर्ष होत राहिली पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत धोरण घेत स्वतःची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आपण नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांचा हक्काच्या जागेचा आणि त्यावरील घरकुल बाबतचा प्रश्न सोडवू असे मनोहर पोटे यांनी सांगितले.
यावेळी नंदकुमार ताडे, बाळासाहेब दुतारे आदी उपस्थित होते.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!