लोणी व्यंकनाथ येथील दुर्दैवी दुर्घटनेतील शोकाकुल कांडेकर कुटुंबीयांचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी केले सांत्वन!

By : Sangharshkranti Team ,2026-07-30

लोणी व्यंकनाथ येथील दुर्दैवी दुर्घटनेतील शोकाकुल कांडेकर कुटुंबीयांचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी केले सांत्वन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 30 जुलै 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरला आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेत  पांडुरंग कांडेकर व  किसन कांडेकर यांच्या नाती कै. आनंदी आणि कै. वीरा या दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचे अकाली निधन झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी लोणी व्यंकनाथ येथे जाऊन कांडेकर कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी धीर दिला आणि कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

चौकट - यावेळी आमदार पाचपुते यांनी दिवंगत आनंदी व वीरा या दोन्ही चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.निरागस वयात दोन चिमुकल्यांचे असे अचानक निघून जाणे ही अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या दुःखाची भरपाई कोणत्याही शब्दांनी होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

तसेच, दिवंगत चिमुकल्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी आणि कांडेकर कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ ईश्वर प्रदान करो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी गावातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनीही दिवंगत चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करत कांडेकर कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. संपूर्ण गाव या दुःखद प्रसंगात कांडेकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!