By : Sangharshkranti Team ,2026-09-05
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 5 सप्टेंबर 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ‘कामधेनू’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आणि साखर उद्योगात आपल्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ओंकार शुगर ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. South Indian Sugarcane & Sugar Technologists’ Association (SISSTA) यांच्या वतीने आयोजित 55व्या Annual Convention & Sugar Expo 2026 मध्ये ओंकार शुगरला ‘Best Factory Award’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
ओंकार शुगरच्या वतीने हा मानाचा पुरस्कार संचालक ओमराजे बाबुराव बोत्रे पाटील यांनी स्वीकारला. साखर उद्योगातील प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे ओंकार शुगरच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची, उत्कृष्ट उत्पादनक्षमतेची आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची झालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
साखर उद्योगातील कर्तृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब :-ओंकार शुगरने अल्पावधीतच साखर उद्योगामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनातील गुणवत्ता, कार्यक्षम नियोजन, काटेकोर व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून केलेले काम यामुळे ओंकार शुगरने सातत्याने प्रगतीची वाटचाल कायम ठेवली आहे.
‘Best Factory Award’ मिळणे ही केवळ कारखान्याची कामगिरी नसून, ओंकार शुगरशी जोडलेल्या प्रत्येक घटकाच्या सामूहिक योगदानाचा गौरव आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत, व्यवस्थापनाचे नियोजन आणि संपूर्ण ओंकार परिवाराची एकजूट या सर्वांच्या बळावर हे यश संपादन झाले आहे.
शेतकरी हिताची दृष्टी ठरतेय ओंकारची ताकद :-ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी साखर उद्योगाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून वाटचाल करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी दूरदृष्टीने घेतलेले निर्णय, ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्याची भूमिका यामुळे ओंकार शुगरने शेतकरी आणि कारखाना यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे.
‘शेतकरी सुखी तर कारखाना समृद्ध’ या विचारातून ओंकार शुगरची वाटचाल सुरू असून, मिळालेला ‘Best Factory Award’ या भूमिकेला अधोरेखित करणारा ठरला आहे.
ओंकार शुगर समूह साखर क्षेत्रात क्रांतीची नवी दिशा देणार :-राज्यातील साखर उद्योगामध्ये अनेक कारखाने कार्यरत असताना ओंकार शुगरने आपल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेमुळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. उत्पादनक्षमता वाढविताना गुणवत्तेला प्राधान्य देणे, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे आणि शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचा विचार करून निर्णय घेणे, या बाबींमुळे ओंकार शुगरकडे साखर क्षेत्रात आशेने पाहिले जात आहे.
बाबुराव बोत्रे पाटील यांची दूरदृष्टी आणि ओमराजे बोत्रे पाटील यांचे युवा, कार्यक्षम नेतृत्व यांचा सुरेख संगम ओंकार शुगरच्या प्रगतीमागे असल्याचे या पुरस्काराने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
चौकट- ‘ओंकार’च्या यशामागे शेतकऱ्यांचा मोठा वाटा,
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ओंकार शुगर परिवाराच्या वतीने या यशासाठी योगदान देणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधव, अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ओंकार परिवारातील प्रत्येक घटकाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
कारखान्याच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा विश्वास हा सर्वांत मोठा आधार असून, शेतकऱ्यांच्या या विश्वासाला अधिक बळ देत ओंकार शुगरची वाटचाल भविष्यातही अधिक गतिमान करण्याचा निर्धार या यशातून व्यक्त होत आहे.
ओंकारच्या कर्तृत्वावर मानाची मोहोर!
SISSTAच्या 55व्या Annual Convention & Sugar Expo 2026 मध्ये मिळालेला ‘Best Factory Award’ हा ओंकार शुगरच्या आतापर्यंतच्या कार्याची पावती असून, भविष्यातील मोठ्या यशाची नांदी ठरणारा आहे.
शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख निर्माण करणारा ओंकार शुगर ग्रुप, साखर उद्योगात नवनवीन प्रयोग आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून क्रांतीची नवी दिशा निर्माण करत आहे. बाबुराव बोत्रे पाटील यांची दूरदृष्टी, ओमराजे बोत्रे पाटील यांचे कर्तृत्व आणि शेतकरी, अधिकारी-कर्मचारी व संपूर्ण ओंकार परिवाराची एकजूट यामुळे ओंकार शुगरने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे.
श्री मच्छिंद्रनाथ गडावरील दसऱ्या मेळाव्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
ओंकार शुगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! SISSTA कडून ‘Best Factory Award’ने ओंकार शुगरचा गौरव..
प्रा.श्रीकांत तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ पदवी!
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!