By : Sangharshkranti Team ,2026-09-05
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 5 सप्टेंबर 2026
(उज्वला उल्हारे)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने प्रा. श्रीकांत तनपुरे यांना ‘विद्यावाचस्पती (Ph.D.)’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘लक्ष्मण लोंढे यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास’ या विषयावर त्यांनी प्रा. डॉ. राजेंद्रसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले.
या संशोधनाची मौखिक परीक्षा विद्यापीठाच्या मराठी विभागात पार पडली. यावेळी बहिःस्थ परीक्षक म्हणून डॉ. केशव देशमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे सर होते.
लक्ष्मण लोंढे यांच्या कथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या, गूढकथा आणि ललित लेखनाचा समग्र व चिकित्सक अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे. विज्ञाननिष्ठ विचार, मानवतावादी दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांचा लोंढे यांच्या साहित्यामध्ये आढळणारा समन्वय या संशोधनातून अधोरेखित करण्यात आला आहे.
प्रा. श्रीकांत तनपुरे हे श्री संत गजानन महाविद्यालय, खर्डा येथे अध्यापनाचे काम करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी संपादित केली आहे.
कर्जत तालुक्यातील दूध संघाचे संचालक दत्तात्रय तनपुरे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुदामती तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही आई-वडिलांनी दिलेली खंबीर साथ आणि प्रेरणा त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारी ठरली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पुणे येथे एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
अध्यापनाची जबाबदारी सांभाळत संशोधनाची वाटचालही त्यांनी सातत्याने सुरू ठेवली. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर त्यांनी संपादन केलेले हे यश उल्लेखनीय मानले जात असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ओंकार शुगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! SISSTA कडून ‘Best Factory Award’ने ओंकार शुगरचा गौरव..
प्रा.श्रीकांत तनपुरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ पदवी!
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!