By : Sangharshkranti Team ,2026-07-27
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 27 जुलै 2026
(उज्वला उल्हारे)
प्रो. पारे सर यांच्या सायन्स फोरम अकॅडमी, श्रीगोंदा येथे JEE, NEET व MHT-CET 2026 परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवून संस्थेच्या यशस्वी परंपरेला आणखी उजाळा दिला. प्रतीक्षा लक्ष्मण कडेकर (99.5311 पर्सेंटाइल), कार्तिक दादासाहेब लबडे (99.4306), अक्षता रविंद्र आढाव (98.9695), पूर्वा बाळासाहेब घायाळ (98.8328), ओम जालिंदर पुवाणे (98.4497), विराज वशिष्ठ खोसे (98.3819), ओंकार कवाडे (97.48) यांच्यासह एकूण ३७ विद्यार्थ्यांनी ८८ ते ९९.५३ पर्सेंटाइल दरम्यान उल्लेखनीय यश संपादन केले.
याच कार्यक्रमात बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अक्षता रविंद्र आढाव हिने महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले तसेच ९१.८३ टक्के गुणांसह श्रीगोंदा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच रोहित जामदार या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सायन्स फोरम अकॅडमीतर्फे लॅपटॉप भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रो. महादेव पारे सर यांनी सांगितले की, सायन्स फोरम अकॅडमीमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET, MHT-CET तसेच बोर्ड परीक्षांची दर्जेदार तयारी करून घेतली जाते. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, संकल्पना स्पष्ट करणारे अध्यापन, नियमित टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन, विद्यार्थीनिहाय प्रगती विश्लेषण आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत आहे.
चौकट - अकॅडमीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल लर्निंग, नियमित ऑनलाइन परीक्षा, विद्यार्थीनिहाय विश्लेषण (Student-wise Analysis), टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक मार्गदर्शन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून बोर्ड तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळत आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद आणि सायन्स फोरम अकॅडमीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी (JEE, NEET, MHT-CET व बोर्ड) प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!